Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सहप्रवासी महिलांनी ९८ हजारांची दागिने लांबविले !
    क्राईम

    सहप्रवासी महिलांनी ९८ हजारांची दागिने लांबविले !

    editor deskBy editor deskDecember 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    लग्न सोहळ्यावरून परतून रिक्षाने घरी जात असताना प्रभावती चुडामण वडीलकर (५९, रा. न्यू पार्वती काळेनगर) यांच्या पर्समधून दोन सहप्रवासी महिलांनी ९८ हजार रुपयांचे दागिने लांबविले. ही घटना ६ डिसेंबर रोजी रेल्वे स्थानक ते न्यू पार्वती काळे नगरदरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे नातेवाइकांकडे लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या प्रभावती वडीलकर या ६ डिसेंबर रोजी रेल्वेने जळगावला आल्या. रेल्वे स्थानकावरून त्या रिक्षाने (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३७७१) घरी जात असताना थोड्या अंतरावरून दोन महिला रिक्षात बसल्या व बसस्थानकाजवळ उतरल्या. वडीलकर या घरी गेल्या व त्यांनी पर्समध्ये ठेवलेले दागिने पाहिले. त्या वेळी त्यांना ५५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत व ४८ हजार रुपये किमतीची पेंडल असलेली पोत दिसली नाही. त्यामुळे या पोत रिक्षातील महिलांनी चोरल्याची खात्री झाली. त्यानुसार प्रभावती वडीलकर यांनी शहर पोलिसात १३ डिसेंबरला फिर्याद दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.