जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी येथील सागर साहेबराव सोनवणे या तरुणाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (१४ डिसेंबर) रोजी घडली. या खूनप्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
रविवारी रात्री मारेकऱ्यांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार केले आणि त्याला जखमी अवस्थेत निमखेडी गावात फेकून दिले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी सागरला मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर याठिकाणी मोठी गर्दी झाली होती



