विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्यूज
जळगाव महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्व प्रमुख पक्षांकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासोबतच मुलाखतींचा टप्पा सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे.
शिवसेना उबाठा गटाने आजपासूनच १९ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या मुलाखतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून प्रत्येक प्रभागातून उमेदवार निवडीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या मुलाखती होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने देखील उमेदवार निवडीसाठी आपली तयारी पूर्ण केली आहे. सोमवार, दि. १५ पासून मंडळी व प्रभागनिहाय वेळापत्रकानुसार मुलाखती घेण्यात येणार आहेत. भाजपच्या या प्रक्रियेमुळे उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली असून पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा प्रत्यय येत आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून देखील अर्ज वाटप व मुलाखतींची तयारी सुरू असून लवकरच या प्रक्रियेला गती मिळणार आहे. या गटाकडून उमेदवार निवडीसाठी काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये उमेदवार निवडीसाठी वेगळीच चुरस दिसून येत आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून जनसंपर्क मोहिमांना सुरुवात झाली आहे. विविध प्रभागांमध्ये कार्यकर्ते घराघरांत पोहोचत असून नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्थानिक प्रश्न, विकासकामे, तसेच नागरिकांच्या अपेक्षा यावर चर्चा होत आहे. उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर करूनही जनसंपर्क वाढवला जात आहे.
जळगाव महापालिकेची निवडणूक ही स्थानिक राजकारणातील महत्त्वाची लढत मानली जाते. त्यामुळे सर्व पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. मुलाखतींच्या प्रक्रियेमुळे पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी अधिकच वाढेल.
जळगावकर नागरिक मात्र या निवडणुकीकडे उत्सुकतेने पाहत आहेत. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणारा उमेदवार कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षांची तयारी, उमेदवारांची चुरस आणि नागरिकांचा सहभाग यामुळे जळगाव महापालिकेची निवडणूक यंदा अधिकच रंगतदार ठरणार आहे.



