Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘विटांचे ट्रॅक्टर आले असून रस्ता दाखवा,’ म्हणत ५० हजारांची फसवणूक !
    क्राईम

    ‘विटांचे ट्रॅक्टर आले असून रस्ता दाखवा,’ म्हणत ५० हजारांची फसवणूक !

    editor deskBy editor deskDecember 14, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील सुनसगाव येथे विटांचे ट्रॅक्टर आल्याचे खोटे सांगून एका दाम्पत्याकडून ५० हजार रुपये लुबाडल्याची धक्कादायक घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी घडली. विशेष म्हणजे ही फसवणूक भर वस्तीतील मुख्य रस्त्यावर दिवसाढवळ्या करण्यात आली असून संबंधित अज्ञात भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, सुनसगाव येथील सुपडू बोराळे (वय ४५, मजुरी) व पल्लवी बोराळे (वय ४०, अंगणवाडी सेविका) हे आपल्या कुटुंबासह गावातील मुख्य रस्त्यालगत वास्तव्यास आहेत. दुपारी सुमारे २ वाजता एक अनोळखी इसम मोटारसायकलवर त्यांच्या घराजवळ आला. ‘विटांचे ट्रॅक्टर आले असून रस्ता दाखवा,’ असे सांगून त्याने सुपडू बोराळे यांना मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्यांना गोंभी फाटा येथील केळी वेफर्सच्या दुकानाजवळ नेऊन बसवले व ‘घरातून विटांचे पैसे घेऊन येतो,’ असे सांगत मोटारसायकलसह पसार झाला.

    दरम्यान, तोच इसम थेट बोराळे यांच्या घरी गेला. त्या वेळी पल्लवी बोराळे भाजीपाला निवडत असताना त्याने विटांचे पैसे देण्याची मागणी केली. पल्लवी बोराळे यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून सीआयएफचे ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम कपाटात ठेवलेली होती. सुरुवातीला त्यांनी १० हजार रुपये देऊ लागल्यावर त्या इसमाने मोबाईलवर बोलण्याचे नाटक करत “१० नाही, ५० हजार द्या,” असे सांगितले. विश्वास ठेवून पल्लवी बोराळे यांनी ५० हजार रुपये दिले आणि तो इसम तात्काळ निघून गेला.

    काही वेळानंतर सुपडू बोराळे घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी संबंधित इसमास आपण ओळखत नसल्याचे स्पष्ट केले. परिसरातील शेजारच्या कृषी केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भामटा कैद झाला असून, नंबर प्लेट नसलेल्या होंडा शाईन मोटारसायकलवर तो आल्याचे दिसून येत आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बोराळे दाम्पत्याने संध्याकाळी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों धिरज मंडलिक तपास करीत असून, परिसरातील व मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित भामट्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.