मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्याने सरकार स्थापन झाल्याने आता नगरपालिकांच्या निवडणूकांची उत्सूकता लागून होतो. या साठीच्या प्रारूप याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांची घोषणा केली आहे. यात १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
असा राहणार निवडणूक कार्यक्रम
७ जुलै अंतीम प्रारूप याद्या जाहीर,
२० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
२२ ते २८ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, स्विकारण्याची मुदत
२९ जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी व यादी प्रसिध्द होणार
४ ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख
८ ऑगस्ट रोजी आक्षेपावर सुनावणी
सुनावणीच्या दुसऱ्यादिवशी चिन्ह वाटप
१८ ऑगस्ट रोजी मतदान
१९ ऑगस्ट रोजी मतमोजणी