Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लहान मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न; राज ठाकरेंचे फडणवीस सरकारवरल पत्र !
    राजकारण

    लहान मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न; राज ठाकरेंचे फडणवीस सरकारवरल पत्र !

    editor deskBy editor deskDecember 13, 2025No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यातील अनेक शहरातून गेल्या काही दिवसांपासून लहान मुलं आणि मुली पळवण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अपहरण झालेल्या मुलांचा अजूनही शोध लागलेला नसल्याचे चित्र आहे. ही समस्या गेल्या काही वर्षांपासून वाढत असतानाही राज्य सरकार किंवा पोलिस प्रशासनाकडून ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्याचे दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. बालकांच्या सुरक्षेसारखा अत्यंत संवेदनशील मुद्दा दुर्लक्षित राहणे हे राज्यासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    राज ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावरही नाराजी व्यक्त केली आहे. सभागृहात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात असताना अनेक वेळा संबंधित मंत्री उपस्थित नसतात, त्यामुळे अशा मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा व्यर्थ ठरते, असा सात्विक संताप त्यांनी व्यक्त केला. बाल अपहरणासारख्या गंभीर विषयावर विधानसभेत ठोस चर्चा न होणे ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे. लोकप्रतिनिधींनी अशा विषयांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

    याच पत्रामधून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. संसदेत वंदे मातरम या विषयावरील चर्चेसाठी दहा तास खर्च केले जातात, मात्र देशातील आणि राज्यातील मुलांच्या सुरक्षिततेसारख्या मूलभूत प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांकडून कोणती प्रतिक्रिया येते, तसेच सरकार या विषयावर नेमकी कोणती पावले उचलते, याकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,

    सस्नेह जय महाराष्ट्र,

    एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही…

    लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?

    यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?

    आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !

    असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.

    राज ठाकरे ।

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    खर्गे आणि सपकाळ यांना फडणवीसांचा बिनडोक टोला !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.