जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरात देशमुख हेल्थकेअर हॉस्पिटलच्या वतीने रविवारी १० जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेश कॉलनी परिसरात देशमुख हेल्थकेअर हॉस्पिटलच्या वतीने रविवारी १० जुलै रेाजी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. या आरोग्य शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. त्याप्रमाणे अल्पदरात एक्स-रे आणि ईसीजी देखील तपासणी करण्यात येणार आहे. इच्छक व गरजूंनी रविवारी १० जुलै रोजी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.