Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीचे वळण घेताना तीन गंभीर जखमी !
    क्राईम

    दुचाकीचे वळण घेताना तीन गंभीर जखमी !

    editor deskBy editor deskDecember 12, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याकडून भुसावळकडे जात असलेल्या रस्त्यावर दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता इंडिकेटर न देता अचानक वळण घेत दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी भोजना येथील आकाश राजेश पाटील (वय २९) हे दि. २४ रोजी सायंकाळी आई वडीलांसह जात होते. यावेळी (एमएच १९, डीझेड ५३४७) क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याने इंडिकेटर न देता तो अचानक वळण घेत त्याने तरुणाच्या (एमएच १९, डीसी ७७३९) क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

    या अपघातात दुचाकीस्वार तरुणासह त्याचे आईवडील गंभीर जखमी झाले. त्यानंतर धडक देणारा दुचाकीस्वार तेथून पळून गेला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आकाश पाटील याने नशिराबाद पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.