लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्य मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नवीन जोशाने तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत.
एकनाथ शिंदे उद्या 8 जुलैला रात्री 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.
या दौऱ्यात शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील.मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच दौरा आहे.
दिल्लीतील भेटीत राज्यातील प्रकल्पांसह मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होऊन मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने पाठिंबा दिला म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. शिंदे यांचे बंड केवळ यशस्वीच झाले नाही तर त्यांना भाजपच्या पाठींब्याने थेट मुख्यमंत्रिपद मिळाले. नव्या सरकारच्या वतीने शिंदे हे दिल्ली दौऱ्यात भाजप नेत्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानणार आहेत