Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कडीकुलूप तोडून कपाटातील सव्वा लाखांची रोकड लंपास !
    क्राईम

    कडीकुलूप तोडून कपाटातील सव्वा लाखांची रोकड लंपास !

    editor deskBy editor deskDecember 11, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकुलूप तोडून कपाटातील रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने असा १ लाख २२ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील वामननगर भागात उघडकीस आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू दामोदर खैरनार (वामननगर, चाळीसगाव) दि. ८ रोजी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास कामाला जाण्यासाठी पत्नीसह घराबाहेर पडले. ते घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप दिसले नाही तर घराचा दरवाजा उघडा होता. घरात जावून पाहिले तर बेडरूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडे दिसले. कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही. अज्ञात इसमाने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख ३५ हजार रूपये असा सुमारे १ लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    जळगाव पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगावात संपविले आयुष्य !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.