जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नेहरू नगर परिसरातील एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १० रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर परिसरात शुभम रविंद्र मराठे (वय २५) हा तरुण आई, वडील, भाऊ, बहीण यांच्अया सोबत वास्सातव्यास होता. शुभमचे वडील रविंद्र हे मोहाडी रोडवर हॉटेल चालवून उदरनिर्वाह करतात. तर मुलगा शुभम हा हॉटेलवर वडिलांना मदत करीत होता. तसेच एका फायनान्स कंपनीत देखील जॉबला आहे. दरम्यान, बुधवारी शुभमच्या घरी कोणी नव्हते. तेव्हा दुपारी २ वाजेच्या सुमारास शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी शुभमला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, शुभमने आत्महत्या का केली याबाबत समजू शकले नाही. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


