हिवाळा सुरू झाला की आहारात बदल करणे गरजेचे ठरते. या दिवसांत गहू, मका, बाजरी असे मोटे धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यापैकी बाजरी ही हिवाळ्यातील सर्वात पौष्टिक आणि फायदेशीर धान्य मानली जाते. बाजरीच्या भाकरीत फाइबर, लोह आणि प्रथिने भरपूर असल्याने ती आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. पचन सुधारण्यापासून डायबिटीजपर्यंत अनेक त्रासांवर बाजरीची भाकरी मदत करते.
बाजरीची भाकरी का खावी?
हिवाळ्यात जर तुम्ही भाकरी खाण्याची सवय ठेवत असाल, तर गव्हासोबत बाजरीची भाकरीही जरूर खा.
याचे मुख्य फायदे,
पचन सुधारते – फाइबर जास्त असल्याने आतडी स्वच्छ राहतात आणि बद्धकोष्ठता कमी होते.
डायबिटीज रुग्णांसाठी उत्तम – बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
शरीराला उष्णता देते – हिवाळ्यात शरीराला आतून गरम ठेवण्यास बाजरीची भाकरी मदत करते.
वजन कमी करण्यात सहाय्यक – पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे जास्त खाणे टळते.
बाजरीची भाकरी कशी बनवायची?
बाजरीचे पीठ गव्हाच्या पिठासारखे सहज लाटता येत नाही, परंतु थोडी काळजी घेतली तर भाकरी छान तयार होते.
पद्धत,
1. एका भांड्यात बाजरीचे पीठ घ्या.
2. त्यात थोडे-थोडे कोमट पाणी घालून मऊसर भिजवा.
3. छोटा गोळा घेऊन ताटावर किंवा चकतीवर हातानेच हळुवार थापा मारून भाकरीचा आकार द्या.
4. तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूंनी नीट शेकून घ्या.
5. हवे असल्यास शेवटी गॅसच्या आचेवर हलके फुलवू शकता.
6. वर थोडेसे तूप लावल्यास भाकरी अधिक चविष्ट आणि पौष्टिक होते.
हृदयासाठीही फायदेशीर
तज्ञांच्या मते बाजरीत असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड हृदयासाठी लाभदायक असते.
वाईट कोलेस्टेरॉल कमी होते.
हृदयविकारांचा धोका घटतो.
जास्त फाइबर असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हिवाळ्यात पचन मंदावते, अशावेळी बाजरीची भाकरी पोट हलके ठेवते आणि आरोग्य चांगले राखते. त्यामुळे तज्ज्ञ सुचवतात की हिवाळ्यात किमान एक महिना तरी बाजरीची भाकरी नियमितपणे खावी.


