Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावमध्ये पाकीटमारांचा पर्दाफाश; १५ हजारांसह तिघे पोलिसांच्या हाती
    क्राईम

    जळगावमध्ये पाकीटमारांचा पर्दाफाश; १५ हजारांसह तिघे पोलिसांच्या हाती

    editor deskBy editor deskDecember 10, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगावच्या अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढताना यावलच्या शेतकऱ्याच्या खिशातील १५ हजार रुपये चोरून नेणाऱ्या खिसेकापरांना गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे अल्पावधीतच गजाआड करत पूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले.

    सविस्तर वृत्त असे कि,  अजिंठा चौफुली परिसरात बसमध्ये चढत असताना शेतकरी प्रवाशाच्या खिशातील १५ हजार रुपये लंपास करणारे तीन खिसेकापरे जळगाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहेत. गुन्हे शोध पथकाने गुप्त माहिती व सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.  दि. 01 डिसेंबर 2025 रोजी यावल येथील शेख कलीम शेख इसाक (वय 50) हे पत्नीचे मेडीसीन घेऊन जळगावहून घरी परतण्यासाठी बसमध्ये चढत होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या पँटच्या खिशातून १५,००० रुपये काढून नेले. घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात CCTNS क्रमांक 877/2025, कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाच्या गंभीरतेची दखल घेऊन पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकाला आरोपी शोधण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सीसीटीव्ही फूटेजचे बारकाईने निरीक्षण करून संशयितांची ओळख पटवली आणि रजा कॉलनी परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी : हमीद अय्युब खान (वय 22), रा. अक्सा नगर, समीर खान अफसर खान (वय 22), रा. शेरा चौक, जळगाव,  शोहेब मेहमुद पटेल (वय 23), रा. शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव या अटक आरोपींकडून फिर्यादीचे संपूर्ण १५,००० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ किरण पाटील, पोहेकॉ गिरीष पाटील, पोना प्रदीप चौधरी व पोकॉ विशाल कोळी यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ गिरीष पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.