लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मंत्रालयात शपथविधीनंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. यातच आज मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांकरता निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याच्या दिशेने सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली, बैठकीत सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्ष पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होत असल्याने पूराचं पाणी मराठवाड्यात वळवण्याचा येणार आहे. त्यानुसार सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार असून हे निर्णय घेतले जाणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार असून या प्रकल्पाला निधी देण्याकरता जागतिक बँकेने सहमती दिली आहे.या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मराठवाड्या येथील शेती पाण्याखाली येणार असून शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे. तसेच यामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर येणार नाही. यामुळे या योजनेचे अनेक फायदे आहेत. दरम्यान पावसाचं जे पाणी समुद्रातील पाणी इतर सांडपाणी पाणी गोदावरी नदीत सोडण्याचा काम काही दिवसांपासून रखडलं होतं. हा प्रकल्प परत सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत.


