‘दृष्टीदाता’ म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील आमच्यासाठी कार्य करीत आहेत – उपस्थितांच्या भावना
जळगाव : प्रतिनिधी
जेव्हा अंधार दूर करून प्रकाश देणारे हात समाजात पुढे येतात, तेव्हा देव माणसाच्या रूपात भेटतो…” रविवारचा दिवस पाळधीसाठी अगदी हाच अनुभव देऊन गेला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवार आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा अक्षरशः जनसागर उसळला.
पहाटे उजेड पडायच्या आधीच आशेच्या प्रकाशासाठी नागरिकांनी शिबिरस्थळी गर्दी केली. सकाळी सातला नोंदणी सुरू होताच रांगा वाढतच गेल्या… एकूण ८१० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० जणांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्यांना थेट पनवेल येथील शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले. तेही विनामूल्य.
सेवेची संवेदना – सर्वांत वेगळी नोंदणी, तपासणी, निदान, पुढील वैद्यकीय मार्गदर्शन अशा सर्व सुविधा एकाच छताखाली. नाश्ता आणि जेवणाची मोफत सोय. वृद्ध नागरिकांना विशेष सहाय्य. एकही व्यक्ती दुर्लक्षित राहू नये याची संपूर्ण काळजी जीपीएस परिवार यांनी घेतली. कित्येक वर्षे धूसर झालेल्या वाटा, आता पुन्हा स्पष्ट दिसतील… हे फक्त उपचार नाहीत, हे आयुष्याला मिळालेलं नवसंजीवन आहे असे अनेक ज्येष्ठांनी कृतज्ञतेने अनुभवलं.
पालकमंत्र्यांना नागरिकांचा सन्मान
जिल्ह्यात सतत आरोग्यसेवेची ज्योत पेटवत ठेवणाऱ्यामंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असून
अनेक रुग्णांनी भावनाविवश होऊन म्हटलं की , आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यांत नवीन प्रकाश भरून,
आमचे गुलाबराव पाटील साहेब म्हणजे खरे ‘दृष्टीदाता’ आहे. समाजसेवेच्या वाटेवर चालताना
कृतज्ञतेच्या अश्रूंनी उमटणारे हे शब्द …..आमच्यासाठी पुरस्कारासारखे असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
या भव्य सेवायज्ञासाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी, डॉ. विजय ब्राम्हणे, असद अन्वर, सायली उटेकर, वैशाली राऊत, पाळधी व चांदसर आरोग्य केंद्रातील कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. निखिल शिंदे, डॉ. ऋषिकेश झंवर, डॉ. प्रीती पाटील, तसेच संदीप पाटील, हर्ष भट, रिकुल चव्हाण, जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी अविरत परिश्रम घेतले.


