Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » म्हसावद येथील अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाची कारवाई
    क्राईम

    म्हसावद येथील अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे पुलाच्या बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आढळून आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार गुरूवार ७ जुलै रोजी दुपारी वाळू साठ्यावर कारवाई करून पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या वाळूचा साठवणूकीचा ठेका देण्यात आला आहे. शासकीय कामासाठी वापरण्यात येणारी वाळू ही जळगाव शहरात अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व महसूल विभागाला ईमेलद्वारे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी गुरूवार ७ जुलै रेाजी दुपारी २ वाजेच्या सुमारास म्हसावद वाळू साठा केलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी महसूल विभागाचे मंडळाधिकारी, तलाठी यांनी पंचनाम्याच्या कारवाईवाला सुरूवात केली आहे. याठिकाणी वाळूसह खडी देखील आढळून आली. आतापर्यंत २५० ब्रास वाळू आणि ९ ब्रास खडी यांचा पंचनामा करण्यात आला आहे. अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता दीपकगुप्ता यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.