Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वयोवृध्दांना हेरून चोरी करणारे परप्रांतीय टोळीला अटक
    क्राईम

    वयोवृध्दांना हेरून चोरी करणारे परप्रांतीय टोळीला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । पोस्ट ऑफीस कार्यालयातून वृध्दाची पिशवी कापून एक लाख रूपयांची रोकड लांबविणाऱ्या दोन जणांना जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

    अधिक माहिती अशी की, मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-७२) यांनी जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. गुरुवारी २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आले होते. यावेळी नातवाने भरणा स्लीप भरली आणि आजोबांनी पोस्टाच्या खात्यातून १ लाख रूपये काढले. पैसे मोजून झाल्यानंतर त्यांनी पैसे सोबतच्या पिशवीत ठेवले आणि ते इतर बँकेत जाण्यासाठी निघाले. त्यावेळी अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश दोघांनी ब्लेडच्या मदतीने पिशवील १ लाख रूपयांची रोकड लांबविली होती. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र साबळे यांनी साध्या वेशात गस्तीवर असतांना सीसीटीव्हीच्या आधारे पोस्ट ऑफीस कार्यालयाच्या परिसरात संशयास्पद फिरतांना आढळून आले. त्यानुसार जिल्हापेठ पोलीसांनी सापळा रचून अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश यांना अटक केली. दोघांनी खाक्या दाखविताच अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दोन्ही संशयितांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.