स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; जळगावातून मुसक्या आवळल्या
जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीची चोरी करणारा सराईत चोरट्याला जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून त्याच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात आल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोकॉ. विजयसिंग पाटील, अनिल देशमुख, सुधाकर आंभोरे, पो.ना. राहूल पाटील, किरण चौधरी, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील आणि चालक प्रमोद ठाकूर यांनी गुरूवार ७ जुलै रोजी दुपारी सापळा रचून संशयित आरोपी विकास उर्फ विक्की शिवाजी महाले याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या एकुण २ लाख २२ हजार रूपये किंमतीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्याकडून आजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे उडघकीला येण्याची शक्यता आहे. पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.