धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. के.एम. पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे.
डॉ. के.एम.पाटील यांनी महाविद्यालयात सलग २० वर्ष मराठी विभाग प्रमुख म्हणून काम बघितले आहेत. १० वर्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासात मंडळावर होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आधारित एकूण १८ पुस्तके प्रकाशित केले आहेत. सन २०१९ मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांनी पाच वेळा आंतरराष्ट्रीय परिषेदेचे आयोजन केले असून ५ वर्षांपासून उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. १ जुलै पासून त्यांनी धरणगाव महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. के.एम. पाटील पदभार स्विकारला आहे.
अन् संधीच सोन करेन….
हे पद मिळाले याचा आनंद आहे काम करण्याची संधी दिली पण या संधीचा ग्रामीण भागातील शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय जीवनात अडचणी दूर करण्यासाठी संधी मिळाली आहे नक्कीच या संधीचं सोनं विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उपयुक्त ठरेल अशी भावना त्यांनी वक्त केल्या.