जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले असून आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थाच्या परिसरात बुधवार ६ जुलै रोजी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे हतनुर धरणाचे ३० दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे ३० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात ४२ हजार ३७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.