लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागल्या आहेत. अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काही मंत्र्याचा शपथविधी तर निवडणुकीनंतर काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीची निवडणूक होणार असून २२ जुलै रोजी देशाचा नवा राष्ट्रपती निश्चित होईल. विशेष म्हणजे जरी दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सर्वच खाती लगेच भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रिपद रिक्त ठेवली जाणार आहे. दादा भुसेंकडे पूर्वीचेच कृषी तर उदय सामंत यांना शिक्षण विभाग देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाला १५ मंत्रीपदे तर भाजप स्वतःकडे २८ मंत्रीपदे ठेवण्याची शक्यता आहे या निवडणुकीत सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांतर्फे यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नव्या सरकारमध्ये गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपाकडे सोपवण्यात येणार तर नगरविकास आणि महसूल ही खाती शिंदे गटाकडे सोपवली जाणार आहे. अर्थ खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.