Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं
    क्राईम

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    editor deskBy editor deskDecember 2, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील जामनेर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रभाग क्र. १० मधील एकलव्य शाळा मतदान केंद्रावर आज (सोमवार, दि. २) मोठा गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदानासाठी आल्याचा संशय असलेल्या एका तरुणाला थेट मतदान केंद्रावरच पकडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

    मतदान केंद्र परिसरात काही संशयास्पद हालचाली दिसून आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणावर लक्ष ठेवले. त्याच्या वर्तनावर शंका आल्यानंतर त्याला थांबवून चौकशी करण्यात आली. यावेळी संबंधित तरुणाने कॅमेऱ्यासमोरच बोगस मतदानासाठी आल्याची कबुली दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून त्यामुळे या प्रकरणाची तीव्रता आणखी वाढली आहे.

    यानंतर कार्यकर्त्यांनी संशयित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून विरोधकांनीही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्या अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पोलीस ठाण्यात हलविल्याने मतदान केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.