नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील 19 किलोच्या कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत सलग दुसऱ्या महिन्यात घट करण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून दिल्लीसह मुंबई, कोलकाता, पुणे, चेन्नई आदी महानगरांमध्ये सिलेंडरचे दर १० ते १०.५ रुपयांनी कमी झाले असून, हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट्स आणि फूड इंडस्ट्रीसाठी हा दिलासा मानला जात आहे.
IOCL च्या आकडेवारीनुसार नवे दर पुढीलप्रमाणे आहेत— दिल्ली : ₹1,580.50 | मुंबई/पुणे : ₹1,531.50 | कोलकाता : ₹1,684 | चेन्नई : ₹1,739.50
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे व नैसर्गिक गॅसचे दर कमी असूनही रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे मोठी कपात करता आली नाही. येत्या काळात रुपया मजबूत झाला तर अधिक घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. एप्रिलमधील ₹50 वाढीनंतर दर स्थिर आहेत.
घरगुती LPG चे सध्याचे दर : दिल्ली : ₹853 | मुंबई/पुणे : ₹852.50 | कोलकाता : ₹879 | चेन्नई : ₹868.50
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर राहिला आणि रुपया सावरला तर आगामी महिन्यांत घरगुती सिलेंडरच्या किमतीतही दिलासा मिळू शकतो.


