जळगाव : प्रतिनिधी
घरात शिरुन झोपलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. ही घटना दि. २६ रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील एका गावात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुटूंबासह वास्तव्यास आहे. संशयित स्वप्नील दत्त सपकाळे हा तरूण ती शाळेत जाताना तिचा पाठलाग करायचा. हा प्रकार मुलीच्या कुटूंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी त्याला समज दिली होती. त्यानंतर त्याने २६ रोजी पहाटे ४ वाजता अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून ती झोपलेली असतांना तिच्यासोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. मुलीला जाग येताच तिने आरडाओरड केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, तालुका पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे.


