जळगाव प्रतिनिधी । बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विराजमान झाले. आता मंत्रीपदासाठीच्या हालचाली निर्माण झाल्या असून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना महसूल मंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी बंडखोरी करून शिंदे गटाला पाठींबा दिला आहे. राजकीय घडमोडी घडल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. आमदार गुलाबराव पाटील यांना यापुर्वी सहकार राज्यमंत्री पद भुषविले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता असतांना अडीच वर्षे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यासह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार संभाळला आहे. खान्देशची मुलूख मैदानतोफ म्हणून नाव असलेले आमदार गुलाबराव पाटील यांना शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात महसूल मंत्री म्हणून नियुक्ती केली जाणार असल्याची विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे. लवकर याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घोषणा करण्याची शक्यता असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.