नवी दिल्ली :वृत्तसंस्था
देशभरातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. त्याच संबधित एक बातमी समोर आली आहे. आजच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधार कार्डमध्ये बदल किंवा अपडेट करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. नाव, पत्ता किंवा जन्म तारीख बदलण्यासाठी आता कोणते कागदपत्र आवश्यक असतील, याबाबत UIDAI ने स्पष्ट माहिती दिली आहे. या नवीन यादीमुळे नागरिकांसाठी आधार अपडेट करणे आता अधिक सोपे होणार आहे.
आधार कार्ड हे लहान-मोठ्या प्रत्येक कामासाठी अनिवार्य झाले आहे. रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत प्रत्येक ठिकाणी याची गरज भासते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अद्ययावत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाव, पत्ता, जन्म तारीख किंवा मोबाईल नंबर अपडेट्ससाठी आवश्यक कागदपत्रांची नवीन आणि सुटसुटीत यादी जाहीर करण्यात आली आहे.
जर तुम्ही येत्या काळात तुमच्या आधार कार्डमध्ये कोणताही बदल करण्याचा विचार करत असाल, तर ही नवीन यादी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
आधार कार्डमध्ये ‘नाव’ अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रं –
-पासपोर्ट (Passport): नावाच्या पुष्टीसाठी हे सर्वात विश्वसनीय कागदपत्र मानले जाते.
-पॅन कार्ड (PAN Card)
-मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
-वाहन परवाना (Driving License)
-सरकारी ओळखपत्र
-विवाह प्रमाणपत्र (Marriage Certificate)
आधार कार्डमध्ये ‘पत्ता’ (Address) अपडेट करण्यासाठी कागदपत्रे-
-पासपोर्ट (Passport)
-बँक पासबुक / बँक स्टेटमेंट
-वीज/पाणी/गॅसची बिले
-भाडे करार (Rent Agreement)
-मतदान ओळखपत्र (Voter ID Card)
-घरपट्टी किंवा मालमत्ता कराची पावती
-रेशन कार्ड
आधार कार्डमध्ये ‘जन्म तारीख’ (Date of Birth) अपडेट करण्यासाठी कागदपत्रे –
-जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
-पासपोर्ट (Passport)
-१० वी किंवा १२ वीची मार्कशीट
दरम्यान, जन्म तारीख बदलण्यासाठी ‘पॅन कार्ड’ (PAN Card) ग्राह्य धरले जाणार नाही.


