जळगाव : प्रतिनिधी
गेल्या १५ ते २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शंकर राठीया मेहता (१७, रा. शिरवेल, अंबागाव, मध्यप्रदेश, ह.मु. विटनेर, ता. जळगाव) या तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (२६ नोव्हेंबर) विटनेर शिवारातील जंगलात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिरवेल अंबागाव येथील शंकर मेहता हा आई, वडील व भावांसह वर्षभरापूर्वी मजुरीसाठी जळगावात आला होता. विटनेर शिवारातील एका शेतात ते शेतमजुरी करीत होते. शंकर अनेक वेळा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून जात होता. मात्र पाच-सहा दिवसानंतर तो पुन्हा घरी परतत होता. आता १५ ते २० दिवसांपूर्वी तो पुन्हा निघून गेला होता



