Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चार तरुणांचा जागीच मृत्यू; अवजड वाहन चालक गंभीर : जामनेरनजीक रात्री अपघात !
    क्राईम

    चार तरुणांचा जागीच मृत्यू; अवजड वाहन चालक गंभीर : जामनेरनजीक रात्री अपघात !

    editor deskBy editor deskNovember 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील पहूर–जामनेर मार्गावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मंगळवारी रात्री सुमारे दहा ते साडेदहाच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी व अवजड वाहनातील धडकेत जामनेरातील तीन आणि पहूरमधील एक तरुण जागीच ठार झाले. तर अवजड वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

    मृतांमध्ये अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय, तिघे रा. जामनेर आणि रवींद्र सुनील लोंढे (रा. पहूर) यांचा समावेश आहे. सर्व मृतांचे वय २२ ते २४ दरम्यान आहे. अपघातग्रस्त वाहनात जनावरांची हाडे आढळून आली असून ही हाडे कोठून कोठे नेली जात होती, याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नव्हती. तसेच जखमी चालकाचे नावही समजू शकले नाही.

    घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे, तसेच गोपाळ माळी, जीवन चव्हाण, ईश्वर कोकणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचदरम्यान पथारीवरून जात असलेल्या पहूरचे सरपंच अब्बू तडवी आणि ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील यांनी थांबून जखमी चालकाला जामनेर रुग्णालयात हलविण्यास मदत केली. चारही मृतदेह जामनेर रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.