Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महिलेची सोनसाखळी हिसकावणारी टोळी अटकेत; फरार खून आरोपीचाही पर्दाफाश
    क्राईम

    महिलेची सोनसाखळी हिसकावणारी टोळी अटकेत; फरार खून आरोपीचाही पर्दाफाश

    editor deskBy editor deskNovember 24, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले असून चोरीस गेलेल्या सोन्याचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

    दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्या नगरतील एक महिला दुचाकीने घरी पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 849/2025 भा.दं.वि. 2023 चे कलम 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती गोळा करून आरोपींची ओळख पटवली. 18 नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागात सापळा रचून पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे सांगितले आणि गुन्ह्याची कबुलीही दिली. त्याने चोरीत आपला साथीदार प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) सहभागी असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे, प्रसाद उर्फ परेश हा शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यापासून फरार होता.

    यादरम्यान पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागातून प्रसाद उर्फ परेश संजय महाजन यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरी केलेल्या मालामधून ८ ग्रॅम वजनाची, किंमत अंदाजे ८० हजार रुपये असलेली सोन्याची लगड पोलिसांनी हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

    ही संपूर्ण कारवाई एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउनि राहुल ताडे, पोउनि चंद्रकांत के., सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लावंजारी, पोह किरण पाटील ठाकूर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठी, पोकॉ चेतन पाटील यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाईवर डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.