लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मान्सून काळातील सर्व यंत्रणांनी आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. सर्व विभागांनी आपल्या विभागाचे स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडीट, ईलक्ट्रिक ऑडीट करुन घ्यावे, नदी काठच्या गावांना वेळोवेळी सूचना कशा पोहचतील याची काळजी घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सोमवारी ४ जुलै रेाजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी दिल्या.
याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची तयारी याबाबत आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, मंत्रालय, मुंबईचे प्रशांत वाघमारे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची कार्य प्रणाली, आपत्कालीन नियंत्रण कक्ष तसेच शासनाकडून राज्यात सर्व जिल्हयांनी कार्यान्वित करण्यात येत असलेल्या आपत्कालीन परिस्थितीत गाव, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समन्वय स्थापन करण्यासाठी Incident Response System विकसित करण्यात आलेल्या प्रणालीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांनाही सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्याम लोही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रविण पाटील यांच्या सह आदी उपस्थित होते.