Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर – बोदवड रस्त्यावर अपघात : दोन चुलत भाऊ जागीच ठार !
    क्राईम

    जामनेर – बोदवड रस्त्यावर अपघात : दोन चुलत भाऊ जागीच ठार !

    editor deskBy editor deskNovember 23, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील पाळधी येथील दोन भाऊ शिरसाळा येथे दर्शनासाठी जात असताना चुलत भाऊ दुचाकी अपघातात ठार झाले. वाडी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी घडलेली ही घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश समाधान माळी (१७) आणि शुभम भिका माळी (२१, दोघे रा. पाळधी ता. जामनेर) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. दोघे चुलत भाऊ शनिवारी सकाळी चार वाजता शिरसाळा येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी पाळधी येथून निघाले. बोदवडकडे जात असताना मालदाभाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण रस्त्याच्या कडेला खोल नाल्यात पडले. त्यांना गळा व डोक्याला जबर मार लागला. दोघेही गंभीर जखमी अवस्थेत तिथेच पडून होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातील काही जण व गल्लीतील तरुण त्यांना शोधण्यासाठी निघाले. त्यावेळी वाडी किल्ल्याजवळ रस्त्यावर त्याची दुचाकी आणि दोघे तरुण मृतावस्थेत आढळून आले. रात्री ९ वाजेच्या सुमारास या चुलत भावांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.