जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातून तरूणाची अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद केली आला आहे.
जळगाव जुना आसोदा रोडवरील समर्थ कॉलनीत राहणारे भाऊलाल कृष्णदेव चौधरी (वय-३८) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २ जुलै रोजी सकाळी ७ वाजता भाऊलाल हे भाजीपाला घेण्यासाठी दुचाकी ने कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी कृषी उत्पन्न बाजार परिसराच्या आवारात उभी केली होती. पुन्हा बाजार करून आले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसून आली नाही.
त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार केली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.



