Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महावितरणचे अधीक्षक अभियंताने घेतली ५ हजारांची लाच !
    क्राईम

    महावितरणचे अधीक्षक अभियंताने घेतली ५ हजारांची लाच !

    editor deskBy editor deskNovember 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भुसावळ येथील दीपनगर महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लांडवंजारी (वय ५७, रा. नेहरुनगर, जळगाव) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तक्रारदाराचे मोठे विद्युत बिल दुरुस्त करून वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी लांडवंजारी यांनी ही लाच मागितली होती.

    अभियंता लांडवंजारी यांच्या अखत्यारीत तक्रारदाराचे वीज बिल दुरुस्त करण्याचे काम होते. त्यांनी २ लाख ५९४ रुपये देयके दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात बिलाच्या ५ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बुधवारी (१९ नोव्हेंबर) एसीबीकडे धाव घेतली. तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर, आज गुरुवारी (२० नोव्हेंबर) एसीबीने दीपनगर येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचला. लांडवंजारी यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच, पथकाने त्यांना रंगेहात पकडून तत्काळ अटक केली.

    पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वी केली. लांडवंजारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ प्रमाणे भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.