गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांचे राजकीय वर्चस्व पणाला
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात नवे सरकार स्थापन झाले मात्र आता एकीकडे मंत्रीपदावरून वादावादी आणि दुसरीकडे पालकमंत्रीपदावरून संघर्ष सुरू आहे. यात पहीलं तर जळगावचे गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन. हा पेच सोडविताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुरती दमछाक झाली आहे.
आधीच सरकार असताना मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. जळगाव जिल्हय़ातून महाजन, गुलाबराव हे दोघेही मंत्री झाले तर पालकमंत्री कोण हा प्रश्न उभा राहणार आहे.जुने पालकमंत्री सरसकट कायम ठेवण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. जळगावच्या पालकमंत्रीपदावरून पाटील-महाजन यांच्या गुंतागुंत निर्माण झाली.जळगावातील भाजप नेते गिरीश महाजनही मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार आहेत.पुन्हा एकदा मंत्रीपदाची माळ गुलाबराव पाटलांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
जळगावात जास्त पॉवरफुल्ल कोण हा संघर्ष उभा राहिला आहे. पालकमंत्रीपद कायम ठेवणार नसाल तर मंत्रीपद नको, अशी भूमिका गुलाबरावांनी घेतली आहे तर पालकमंत्री करणार नसाल तर मंत्रीपद नको, असे महाजन म्हणत आहेत. त्यामुळे शिंदे, फडणवीस पेचात सापडले आहेत. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झाले.