लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात रविवारी, दि. 3 ते 6 जुलै असे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले दोन दिवस राज्यात पाऊस मुसळधार नाही. पावसाची एक जोरदार सर येते व काही वेळात जाते,
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, रविवारी, 3 रोजी जोरदार पाऊस पडतो. येत्या 5 जुलै पासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची देखील हवामान विभागाने वर्तविली आहे.
सोमवारी, 4 पासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे दि.3 ते 6 जुलै या काळात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेले काही दिवस पाऊस शहरी भागात तुरळक हजेरी लावत असून, ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील शेतकरी पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कालपासून देशभरात मान्सून दाखल झाला असून येत्या काळात महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडू शकतो.विदर्भात व मराठवाड्यात काही ठिकाणी वीजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता आहे
भंडारा जिल्ह्यात देखील सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 37.6 इंच पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 4 टक्के पाऊस कमी पडलेला आहे. तापमानात घट झालेली असून, पणजीत कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 24.5 अंश सेल्सिअस नोंद झाले आहे.