लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, भाजपचे उमेदवार असलेले राहुल नार्वेकर यांचा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय झाला आहे. यासाठी ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता होती.निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी आणि एम आय एम चे आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेच्या राजन साळवी यांना 107 मते मिळाली.
प्रथम आवाजी आणि त्यानंतर शिरगणती पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतला. या निवडणुकीत भाजपच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. त्यांना 164 मते मिळाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.