लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच या सरकारचा खरा चेहरा कसा असेल याकडे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री तर आता चंद्रकांत पाटील यांच्यावर काय जबाबदारी याची चर्चा सुरु झाली.
पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा सहभाग होणार आणि कुणाला बाजूला व्हावे लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पहिल्या फळीतील नेते असले तरी सर्वकाही पक्ष श्रेष्ठींकडून सूत्र हलवली जातात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार तर आता चंद्रकांत पाटलांना केवळ पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
पण त्यांचाही एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात समावेश नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या प्रदेशाध्यक्ष हे पक्षाचे पद आहे. त्यामुळे आगामी काळातही त्यांना पक्ष विस्तारासाठीच काम करावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळात तर समाविष्ट व्हावे लागले पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. असे असताना चंद्रकांतन पाटलांवर मंत्रीमंडळातील कोणती जबाबदारी दिली जाणार याची चर्चा सुरु असतानाच त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरच रहावे लागणार आहे. या माध्यमातून पक्षाचा विस्तार करावा लागणार आहे.