लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज जळगावात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा होता. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात जळगाव जिल्ह्यातील चार शिवसेना आमदार व एक अपक्ष आमदार यांचा सहभाग आहे. साधारण दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुलाबराव वाघ हे आपल्या समर्थकांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आक्रोश मोर्च्यात सहभागी होत होते. एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात धमकी दिली. वाघांनी देखील प्रतिउत्तर दिले.
मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्ही शिंदेसाहेब आणि जळगाव जिल्ह्यातील शिंदे साहेबांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात खूप बोलताय. तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात एकाने व्यक्तीने गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. गुलाबराव वाघहे आक्रोश मोर्च्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.