Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० लाखांची रोकड लंपास !
    क्राईम

    कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० लाखांची रोकड लंपास !

    editor deskBy editor deskNovember 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कंपनीतून रक्कम घेतल्यानंतर रस्त्याच्या कडेला मोबाइलवर बोलण्यासाठी थांबलेल्या कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली. ही घटना शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील रेमंड चौकाच्या पुढे बीएचआर पतसंस्थेच्या कार्यालयाजवळ घडली. सात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसीतील तेलाच्या कंपनीतून सायंकाळी १० लाख रुपयांचे पेमेंट घेऊन एक कुरीयर बॉय जुने बसस्थानक परिसरात दुचाकीने जात होता. त्याच्या मालकाने त्याला कॉल केला व कुरीयर बॉय बोलण्यासाठी रस्त्याच्याकडेला थांबला. यावेळी दुचाकीवर दोन जण तेथे आले व त्यांनी कुरीयर बॉयच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून दुचाकीला लावलेली रोकडची पिशवी घेवून चोरटे छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने पसार झाले. याविषयी माहिती मिळाल्यानंतर एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड हे पथकासह घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती घेतली. पथकाकडून कुरीयर बॉयची चौकशी करण्यासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेची तपासणी सुरू करण्यात आली

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.