लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ; सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार तब्ब्ल ११ दिवसांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
शिंदे मंत्रिमंडळाचे ३ जुलै पासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होणार असून, याच पार्श्वभूमीवर आमदारांना मुंबईत बोलवण्यात येत आहे. आमदारांच्या सुरक्षतेसाठी गोव्यातील ताज कॉन्व्हेंशन हॉटेलबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहे. गोवा विमानतळावर आमदारांसाठी स्पेशल स्पाईस जेटच्या चार्टर विमानतून सर्व आमदार मुंबईला येणार आहेत. सर्व आमदार गोवा पोलीस, गोव्याची कमांडो युनिट यांच्या घेराव्यात आमदारांच्या एकूण तीन बस आहे.
आमदारांच्या स्वागतासाठी मुंबईत जय्य्त तयारी सुरू आहे. मुंबई विमानतळाच्या गेट नंबर ९ च्या मार्गावर ढोल ताशे मागविण्यात आले आहेत. भाजप आणि शिंदे गटाची २ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता संयुक्त बैठक पार पडेल. आतापर्यंतच्या रणनीतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील.