Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : बाथरुममध्ये चार वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडले गरम पाणी दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    धक्कादायक : बाथरुममध्ये चार वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर पडले गरम पाणी दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 14, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अंगावर गरम पाणी पडल्यामुळे गंभीररित्या भाजल्या गेलेल्या चेतन जितेंद्र पाटील (वय ४, रा. वाटीका आश्रम) या चिमुकल्याचा उपचार सुरु असतांना दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाटीका आश्रम परिसरात जितेंद्र पाटील हे वास्तव्यास असून ते एसटी वर्कशॉपमध्ये नोकरीस आहे. आठ दिवसांपुर्वी त्यांचा चार वर्षांचा मुलगा चेतन हा घरात खेळत होता. खेळत असतांना त्याने आईकडे पोहे खाण्यासाठी हट्ट धरला. त्याची आई पोहे तयार करण्यासाठी कांदे कापत असताना, चेतन खेळत असताना अचानक बाथरुममध्ये गेला तेथे बादलीत ठेवलेले गरम पाणी चुकून त्याच्या अंगावर पडले. गरम पाण्यामुळे चेतन गंभीररित्या भाजला गेला होता. त्याला तातडीने शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

    भाजलेल्या जखमांमुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे वाटीका आश्रम परिसरात तसेच पाटील कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू; मंदिर परिसरात घडली हृदयद्रावक घटना

    April 13, 2026

    ऑनलाईन रेटिंगच्या आमिषाने शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

    April 13, 2026

    शस्त्रसाठा जप्त: वरणगाव पोलिसांची धडक कारवाई, मध्यप्रदेशातून पुरवठादार अटकेत

    April 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.