नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये रालोआची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे झाली आहे. ताज्या ट्रेंडनुसार, राज्यात पुन्हा एकदा रालोआचे सरकार स्थापन होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे आणि एनडीएने बहुमताचा आकडा सहज ओलांडला आहे. आता भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाल्यास मुख्यमंत्री पदावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशातच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंहांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.
निवडणूक आकडेवारीनुसार, दुपारी १२ वाजेपर्यंत, भाजप ८६ , जेडीयू ७८ , आरजेडी ३१ , एलजेपी रामविलास २१ , सीपीआयएमएल ६ आणि काँग्रेस ५ जागांसह आघाडीवर आहेत. एकूण २३८ जागांसाठी कल समोर आले आहेत, तर अधिकृत विजय अद्याप जाहीर झालेला नाही. तथापि, सध्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. अंतिम निकाल जसजसे येतील तसतसे बिहारचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.
आजच्या तरुणांनी पूर्वीच्या कुशासनाचे काळ पाहिलेले नसले तरी त्यांच्या वडिलांनी नसतील ‘जंगल राज’ पाहिले आहे. बिहार भ्रष्ट नेत्यांच्या हाती सोपवला जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत बिहारमधील सरकारच्या नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री पदाबद्दलच्या गोंधळाची गरज नाही. राज्यात नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असे बिहारमधील बेगुसरायचे खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री गिरीराज सिंह यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना स्पष्ट केले आहे.


