लाईव्ह महाराष्ट्र न्यूज गौरव पाटील :भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.जळगावात शिवसेनेतील बंडखोरीने शिवसैनिक नाराज आहेत. पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोर्चे काढले.
राज्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांना घेऊन बंड पुकारला होते. सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी व शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना परतण्याचे आवाहन केले होते.
काही कारणांनी परतले नाही. भाजपने नवीन खेळी खेळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. यामुळे बंडखोरांबाबत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाली आहे.
तसेच आपण सर्व शिवसेना आणि सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, हे दाखवून देण्यासाठी शिवसेनेकडून आक्रोश मोर्चाचे जळगावात आयोजन करण्यात आले होते. शहरातील चित्रा चौक येथून शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी भगवे झेंडे घेवून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.