जळगाव : प्रतिनिधी
पाणी पुरी विक्रेत्याने पैसे देण्याास नकार दिल्याने देविदास गोवर्धन चितळे (वय ५४, रा. वाघनगर) यांच्यासह त्यांचा मुलावर चॉपरने वार केले. यामध्ये देविदास चितळे जखमी झाल्याची घटना रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेला मायादेवी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी संशयित गणेश बुधा सोनवणे (रा. समता नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील वाघ नगरात राहणारे देविदास चितळे यांची महाबह रोडवरील माया देवी मंदिराजवळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. दि. ११ रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गाडीवर गणेश सोनवणे नामक तरुण आला. त्याने मला पाणीपुरी लवकर लाव असे म्हणाला. चितळे यांनी त्याला थांब म्हटले असता, तो संशयित गणेश सोनवणे हा त्यांच्याकडे पैसे मागू लागला. तयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्या संशयिताने पाणीपुरी विक्रेता चितळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लेखोर सोनवणे याने त्याच्याजवळ असलेल्या चॉपरने चितळे यांच्यावर वार केला. त्यांनी तो वार चुकवला मात्र त्यांच्या हाताच्या कामेवर चॉपर लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
वडीलांवर चॉपरने वार होत असल्याने चितळे यांचा मुलगा पुजन हा आवरण्यासाठी आला असता, संशयित गणेश सोनवणे याने त्याच्या पाठीवर वार केले. परंतू पुजन याने स्वेटर परिधान केल्यामुळे त्याला दुखापत झाली नाही. परिसरातील नागरिकांनी त्या दोघांची सुटका करुन चितळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित गणेश बुधा सोनवणे (रा. समता नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मायादेवी मंदिराजवळ घडली. पोलीस ठाण्यासमोर संशयित थेट चॉपरने हल्ला करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.


