Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला : हल्लेखोर फरार !
    क्राईम

    अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला : हल्लेखोर फरार !

    editor deskBy editor deskNovember 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    शहरातील मलकापूर रस्त्यावरील टेनिस कोर्टमध्ये रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील काही मुले टेनिस खेळत असताना अल्पवयीन काही बालकांनी एका बालकावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले खेळत असताना त्या ठिकाणी काही सात ते आठ अल्पवयीन मुले आले व त्यांनी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन ते तीन बालकाच्या हातात धारदार चाकू होता. चाकू पाहून काही विद्यार्थी तेथून पळून गेले, तर पाचवीत शिकणारा ११ वर्षीय स्वरूप यशपाल बडगुजर याच्यावर इतर अल्पवयीन बालकांनी काहीही विचार न करता चाकूने वार केला. त्यात तो रक्तबंबाळ झाला. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. स्वरूपच्या सोबत असलेल्या काही बालकांनी त्याच्या घरी संपर्क करत माहिती दिली. त्याला रुग्णालयात आणले असून, उपचार सुरू आहे.

    ही घटना कळताच सर्व पालक बोदवड पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यांना ही माहिती मिळताच ते अल्पवयीन बालकांच्या शोधासाठी रवाना झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत बोदवड पोलिस ठाण्यात पालकांचा जमाव गुन्हा नोंद करण्यासाठी थांबून होता. गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या अल्पवयीन बालकांनी बाजारपेठेमध्येही दहशत माजवली असून, पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.