लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिंदे गटाने बंडाळीची भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात आधीच भूकंप झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. अखेर भाजप आणि शिंदे गटाने राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. पत्रकार परिषदेत बोलताना ‘एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील,’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच असल्यानं लहान वयातच एकनाथ शिंदेंनी गावाला रामराम केलं. आणि ठाण्यात दाखल झाले आहे. ते तिथेच स्थायिक झाले.ठाण्यातील कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून त्यांनी शालेय शिक्षण, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून ११ वीचे शिक्षण पूर्ण केले. अशातच आर्थिक अडचणींमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले.
एकनाथ शिंदे यांची कारकीर्द भाजपने मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिलेले एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर वर्णी झाले आहेत. रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास मोठा रंजक आहे.
एकनाथ शिंदे यांची सध्या राज्यभर नाहीतर देशभर चर्चा पसरली आहे. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आनंद दिघे यांच्या तालमित घडलेले एकनाथ शिंदे मागील अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्यात एकनाथ शिंदे मोलाची कामगिरी केली आहे.
त्याचबरोबर 2019 साली शिवसेना-भाजप युती तुटली आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यासोबत महाविकास सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये शिंदे नगरविकासमंत्री होते.