लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याची माहिती मिळाली असताना देखील दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदारांची माहिती कशी नव्हती? असे सवालही उपस्थितीत झाले होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरींच्या हालचालींबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना तब्बल ४ वेळा क्लपना दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आठ ते दहा आमदार होते असा इशारा एसआयडीनं दिला होता अशी माहिती समोर येत आहे.
शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सहा वेळा पक्षात बंडखोरी होत असल्याची माहिती दिली होती, गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या माहितीच्या आधारे ही माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईकडे निघाले आहे.