चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय विवाहितेकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या तरुणावर चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विनोद बापू पाटील याने संबंधित विवाहितेकडे पाहून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सुरुवातीला विवाहितेने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु दोन दिवसानंतर त्याने तिला मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्याचप्रकारे अश्लील हावभाव करून त्रास दिला.
या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयित विनोद बापू पाटील याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


