जळगाव : प्रतिनिधी
मद्याच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या तरूणाला समजविण्यास गेलेल्या एकावर चॉपरने हल्ला केला. ही घटना दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता शिरसोली प्र.बो. येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे मंगश भगवान नाईक (वय २९) हा वास्तव्यास आहे. दि. ३ नोव्हेंबर रोजी रात्री गोकूळ अशोक चौधरी हा मद्याच्या नशेत शिवीगाळ करत होता, तेव्हा मंगेश हा त्याला समजविण्यासाठी गेला असता, त्या गोकूळ आणि यश चौधरी यांना राग आला. गोकूळ याने मोगरीने तर यशने मंगेशवर चॉपरने हल्ला केला, यात ते गंभीर जखमी झाले असून मंगळवारी त्यांनी फिर्याद दिली त्यानुसार गोकूळ आणि यश चौधरीविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


