Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विश्वास बसल्यावरच महिलेने केली डॉक्टराची लाखो रुपयात फसवणूक !
    अमळनेर

    विश्वास बसल्यावरच महिलेने केली डॉक्टराची लाखो रुपयात फसवणूक !

    editor deskBy editor deskNovember 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील डॉ. विकास सोमेश्वर पवार यांना तब्बल २७लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. पवार यांनी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथे ‘कृष्णा डेंटल क्लिनिक’ चालवणारे डॉ. विकास पवार (वय ४८, रा. मुंदडा नगर-२, अमळनेर) हे फेसबुकवर नियमित सक्रिय होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना अंकिता देसाई नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. या महिलेने डॉ. पवारांना ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस नावाची एक कंपनी असून, त्यात पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. अंकिता देसाईने व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामद्वारे डॉ. पवारांशी संपर्क साधला. तिने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवून वेबसाईटस आणि हॉटेल्सना ५ स्टार रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. प्रत्येक टास्क पूर्ण झाल्यावर भरलेल्या रकमेवर ०.२५ टक्के नफा मिळेल, असे सांगितले

    डॉ. पवारांनी दि. ९ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर त्यांना अॅपमध्ये ९०० रुपयांचा नफा दिसून आला. ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला. यानंतर वारंवार टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर डॉ. पवारांनी वेळोवेळी एकूण २७ लाख ९५ हजार ६३० रुपये भरले, अॅपमध्ये त्यांना ३६ लाख ८२ हजार २७५ रुपये नफा झाल्याचे दिसत होते.

    जेव्हा डॉ. पवारांनी भरलेली मूळ रक्कम आणि झालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पैसे काढणे शक्य झाले नाही. त्यांनी अंकिता देसाईशी संपर्क साधला असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आणखी पैशांची मागणी करू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. पवारांनी २९ ऑक्टोबर रोजी सायबर पोर्टलवर तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    भोंदू बाबा प्रकरणावरून बच्चू कडू आक्रमक; “मला बदनाम करण्यामागे भाजपचा अजेंडा”

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.